Posts

मैत्रिणी

पहाटे उठून मोठ्या आईने परसदारीच्या चुलीवर मुंबऱ्याचं गोड बनवलं . नारळाच्या दुधाचा , गुळाचा , व वेलचीपुडीचा खमंग वास दरवळला . ठीक नऊ वाजता स्नेहांजली आश्रमा च्या भेटण्याच्या वेळेत आम्ही दोघी माझ्या दुचाकीवरून निघालो . दरवर्षी १४ फेब्रुवारीला हा आमचा सकाळचा कार्यक्रम ठरलेला . सिस्टर     ग्रेटाने दरवाजा उघडताच मोठ्या आईने मुंबऱ्याचं गाठोडं तिच्या स्वाधीन केलं . योग व प्राणायामचं सत्र चाललं होतं . कोणी बसून तर कोणी चटईवर झोपून आपापल्या परीने योगसाधना करीत होत्या . टीना मावशी दिसली . ती ताठ कण्याने पद्मासनात बसून डोळे मिटून दीर्घ श्वास घेत होती . चंदेरी केसांचा स्मार्ट बॉब , सडपातळ शरीरयष्टी , स्टॅन्ड कॉलरचा खास फिटिंगचा शिवून घेतलेला मोरपिशी खादी सिल्कचा कुर्ता . तिला नाही आवडत दिवसभर नाईट गाऊन घालायला . टीना मावशी मोठ्या आईची सर्वात मोठी बहिण . लग्नानंतर फ्रान्सिस मावश्यांच्या बरोबर त्यांच्या नोकरीच्या निमित्ताने कॉटन ग्रीनला राहायची . लहानपणी आम्ही तिच्या घरी गेलो की आग्रहान